Chalisgaon

वाकडीचे शहीद जवान अमित साहेबराव पाटील यांच्या परिवाराची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतली सांत्वन भेट .. परिवारातील सदस्यास नोकरी साठी पाठपुरावा सुरू

वाकडीचे शहीद जवान अमित साहेबराव पाटील यांच्या परिवाराची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतली सांत्वन भेट .. परिवारातील सदस्यास नोकरी साठी पाठपुरावा सुरू

नितीन माळी चाळीसगाव

वाकडी (चाळीसगाव ) : गेल्या १६ तारखेला जम्मू काश्मीर येथे सीमा सुरक्षा दलामध्ये असलेले जवान वाकडी गावाचे सुपुत्र अमीत साहेबराव पाटील हे अंगावर हिमकडा कोसळल्याने विरगतीस प्राप्त झाले होते. आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शहीद जवान अमित पाटील यांच्या घरी जावून परिवाराची सांत्वन भेट घेतली. यावेळी वीर जवान अमीत पाटील यांचे वडील साहेबराव पाटील यांनी अमीत पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी त्यांची समजूत घालत शहीद अमीत पाटील यांच्या बलिदानाचा देशाला अभिमान असुन वाकडी गावासह समस्त देशवासियांना अमीत पाटील यांचे बलिदान कायम स्मरणात राहील. अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी शहीद जवान यांच्या पश्चात करावयाची कागदपत्रांची पूर्तता बाबत परिवारातील सदस्याशी चर्चा करून संबधित कमांडंट अधिकारी यांचेशी बोलुन शहीद जवान यांच्या पत्नी आणि लहान बंधू यांच्या नोकरीसाठी तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्यात.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष के. बी. दादा साळुंखे, रमेश आण्णा पाटील, अशोक पाटील, विनोद पाटील. केतन पाटील, मच्छिंद्र सोनवणे, पत्रकार एम. बी. आबा पाटील, रंगनाथ काका मिस्तरी, संजय पाटील, रवींद्र पाटील. प्रा. किरण पाटील, नरेन्द्र काका जैन, राकेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button