चोपडा – प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आज शेतकरी फसवणूकीचे बळी ठरत आहेत.खराब बियाणे,महागडी खते व किड पोषक नैसर्गिक वातावरण,विषारी फवारणी तंत्र यामुळे शेती करणे दिवसेंदिवस जाईल होत चालले आहे.शेतकऱ्यांच्या घरात अनेक अरिष्टांना तोंड देत उत्पादन आले की, बाजारपेठेत पुन्हा त्याला नाडविण्याचे धोरण आहे.परंतु फायद्याची शेती करण्यासाठी शासनाने सुविधा पुरविणे आणि उत्पादन खर्चावर अधारित भाव देण्याची भुमिका घेतली पाहिजे.सुधारित तंत्रज्ञानाच्या नावाखाली परकिय कंपन्या भारताच्या शेतकऱ्याला लुबाडत अाहेत असा ठपका ठेवून पुराणात भगवान बलराम यांनी जोपासलेले कृषी तंत्र आजही जोपसल्यास उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर यांनी येथे केले.
कृषी देवता भगवान बलराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चोपड्यातील कार्यक्रमात प्रा.बडगुजर बोलत होते.राजकारणाच्या शिरकावामुळे शेतकरी संघटना अलिकडे आपल्या उद्देशापासून भरकटल्या आहेत.तथापि भारतीय किसान संघ राजकारण विरहित काम करीत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या संघटनेच्या झेंड्याखाली एकवटले पाहिजे असे आवाहनही केले.
या कार्यक्रमात प्रारंभी भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पुजन भारतीय किसान संघाचे माजी जिल्हा संघटक विठ्ठलदास गुजराथी, माजी उपाध्यक्ष गोविंदराव मराठे,जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर,तालुकाध्यक्षा कविता वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत नेवे यांनी केले.
याप्रसंगी भारतीय किसान संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय बारेला,मंत्री भगवान न्हायदे,कार्यकारणी सदस्य गोकुळ पाटील,उल्हास गुजराथी, संदीप साळुंखे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन भगवान न्हायदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमंत वाणी,राहुल महाजन व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
आंबाडे ता.चोपडा येथे शाखेचे उद्घाटन
भारतीय किसान संघाच्या चोपडा तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन आंबाडे येथे जिल्हाध्यक्ष मनोहर बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच भगवान बलराम जयंती निमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्षा कविता वाणी,श्रीकांत नेवे,संजय बारेला,भगवान न्हायदे,
सचिन धनगर,नवल धनगर,दिलीप तायडे, जगदीश वावरे,विष्णू पानझाडे,भरत पाटील ( रुखणखेडे),हेमंत वाणी आदी उपस्थित होते.








