प्रतिनिधी विलास ताठे
नामदार हरीभाऊजावळे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे.मानाचा पाराचा गणपती रावेर येथुन आरती करुन सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तहसील कार्यालय रावेर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती माजी जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती सुरेश झनके यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करतांना जलसंपदा मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन,माजी मंत्री एकनाथराव खडसे,खासदार रक्षा खडसे,भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर,बेटी पढाव चे संयोजक डॉं.राजेंद्र फडके,उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर,भाजप जिल्हाध्यक्ष संजीव पाटील,आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे,भाजप जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,ज्येष्ठ नेते सुरेश धनके,हिरालाल चौधरी,मसका चेअरमन शरद महाजन,संचालक नरेंद्र नारखेडे,व्हाइस चेअरमन भागवत पाटील,हरीश गणवानी,रावेर पस सभापती माधुरी नेमाडे,यावल पस सभापती पल्लवी चौधरी हे उपस्थित राहणार आहेत
माहिती देतांना सुरेश धनके म्हणाले की हरीभाउंच्या माध्यमातून पाच वर्षात शेती,रस्ते, विज आणि पाणी संधर्भात भरघोस अशी कामे झाली आहेत.मतदारसंघात अस एकही गाव नाही तिथे हरीभाउनी काम केल नाही.विजय हरीभाउचा नक्कीच आहे.फक्त आता झालेली काम लोकांन पर्यंत पोहचवणे आता ही सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.हरीभाऊ हे शेती आणि मातीवर प्रेम करणारे नेते असल्यामुळे सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांन मधे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरणात दिसते आहे
या वेळी सर्व जिप पस सदस्य,नगरसेवक,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सर्व आघाडी अध्यक्ष,सदस्य,पदाधिकारी,लोकप्रतिनिधी ,पेज प्रमुख,शक्ती केंद्र,बुथ प्रमुख, कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी व हरीभाऊ जावळे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष पद्माकर महाजन,डॉ.मिलिंद वायकोळे, रावेर भाजप तालुका अध्यक्ष सुनील पाटील,यावल तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे,रावेर भाजप सरचिटणीस वासुदेव नरवाडे,महेश चौधरी,यावल भाजप सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिह राजपूत यांनी केले आहे.







