Pandharpur

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला बचत गट संदर्भामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला नगरसेवक तथा माजी शिक्षण सभापती संजय निंबाळकर यांचा जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला बचत गट संदर्भामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला नगरसेवक तथा माजी शिक्षण सभापती संजय निंबाळकर यांचा जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरात व तालुक्यात कोरोनाच्या या महामारीत बचत गट हप्ते भरणे आता अशक्य झाले आहे त्यामुळे हे कर्ज माफ करून मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंढरपूर तहसील कार्यालय येथे महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी मी वैयक्तिक स्वतः नगरसेवक या नात्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला बचत गट संदर्भामध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाला जाहीर पाठिंबा देत आहे कारण महिला बचत गट कर्ज घेताना आपल्या कर्जातून विमा रक्कम काढून घेतली जात असते कोरोनो सारखे महाभयंकर रोगाने थैमान घातले असून या संकटामध्ये महिलेला हाताला काम नाही परंतु विमा रक्कम काढून घेऊन त्यांचे सर्टिफिकेट मिळाले नाही त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीत विमा लागू करणे अशक्य झाले आहे व्यवसाय बुडाले साहित्याची नासाडी झाली यामुळे महिला आता नव्याने व्यवसाय करणे अवघड झाले आहे तरी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला माझा वैयक्तिक नगरसेवक या नात्याने जाहीर पाठिंबा देत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button