Pandharpur

आ. समाधान आवताडे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडल्याचे चिञ

आ. समाधान आवताडे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडल्याचे चिञ

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : केंद्र तसेच राज्य शासणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कमीत-कमी व्याज दरात पिक व त्या पिकांच्या क्षेञाच्या आधारे ठरवून दिलेली रक्कम पिक कर्ज म्हणू कमीत कमी कागदपञांच्या आधारे अल्प मुदतीसाठी देण्याची शासणाची योजना आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अनेक बँका या शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करून नाहक त्रास देत असल्याचे पहावयास मिळत आहे. जरी पीक कर्जाचे अर्ज मागणी ऑनलाईन असली तरी ओरिजिनल कागदपञ व पुढील बाबींसाठी बँकेत जावे लागत असून या अगोदरच शेतकरी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोणाच्या संकटात अधिक घुसमटलेला असल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे त्यातच पावसाळा तोंडावर आला किंबहूना तो सुरू झाला तरीही अद्याप पिक कर्जाचे वाटप पंढरपूर तालुक्यातील अनेक बँकांकडून मनावे असे झाले नसल्याचे दिसून येते आहे त्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अधिक कागदपत्रांची मागणी करणे व वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडणे असल्याने शेतकरी हतबल व अधिक निराश झाला आहे. आपल्या पीक कर्जाच्या प्रश्नाबाबतच्या मागण्या प्रमुख शासकीय व बँक अधिकारी यांची एकादी बैठक घेऊन पंढरपूरचे आ.समाधान आवताडे हे आपल्या पीक कर्जाचा प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा शेतकर्यांमधून होती परंतु तसे होताना दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. निदान अतातरी लवकरात लवकर आ.समाधान आवताडे यांनी आपण या विधानसभा क्षेञाचे लोकप्रतिनिधी आहोत या नात्याने पंढरपूर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व पीक कर्ज देण्यास पाञ असलेल्या बँक अधिकारी यांची बैठक घेऊन किंवा लेखी पञाव्दारे सुचना द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button