Latur

मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब कळकळीची विनंती.. विवेक कांबळे

मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब कळकळीची विनंती..
विवेक कांबळे

लक्ष्मण कांबळे

17 मे.नंतर सरकारने जर लोक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला तर दहा वेळा विचार करून हा निर्णय घेण्यात यावा साहेब यामध्ये श्रीमंत लोकांचे ठीक आहे आणि सहा महिने एक वर्ष जरी बसून घरामध्ये राहू शकतात खाऊ शकतात पण मध्यमवर्गीयांचा काय ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांचं काय फारच गरीब आहे त्यांना सरकारच्या सुविधा मिळत आहेत जो श्रीमंत आहे त्याला सुविधांची गरज नाहीये जो मध्यमवर्ग आहे त्यांना कसले सुविधा काय करायचं ते मध्यमवर्गीयांनी कुठे जायचं दोन महिन्याचा काळ उलटून गेला राहायचं कसं मध्यमवर्गीयांनी काय खायचं मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जगत असताना कमवणारा हात एक आणि खाणारी हात चार असतात मग त्या मध्यमवर्गीय लोकांनी सरकारची कसलीही सुविधा मिळत नाही. आतापर्यंत एक रुपयाची मदत मध्यमवर्गीय लोकांना ना सरकारकडून मिळाली ना स्थानिक आमदार खासदार नगरसेवक न सरपंच यांच्याकडून मिळाली त्यांना राशन पाच किलो तांदूळ पाच किलो गहू अशी कसली मुभा मिळत नाहीये कारण त्यांची राशन कार्ड गावाकडचे असते मग कशी मिळणार मुंबईत राहत असलेल्या मध्यम वर्गीय लोकांना मुभा
मुंबई पुणे या ठिकाणी राहत असलेल्या मध्यमवर्गीय लोकांना रूम भाडे भरावेच लागते पाणी चे बिल भरावे लागते अनेक खर्च असतात ते करावेच लागत असतात राशन स्वतःचं स्वतः भरावाच लागते काय करायचं साहेब मध्यमवर्गीय जगायचा की मारायचा आणि जगायचं तर कसं दोन महिने काळ उलटून गेला जगता जगता नाकी नऊ आले काय करायचं साहेब नेमकं मध्यमवर्गीयांनी जाणायचं तरी कसं नंतर लॉक डाऊन वाढवण्यात आले तर मध्यमवर्गी हा मरून जाईल साहेब म्हणून म्हणतोय 10 वेळेस विचार करून निर्णय घेण्यात यावा मध्यमवर्गीयांसाठी मदत करण्यात यावी..
विवेक कांबळे यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून केली मागणी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button