स्वेरी’च्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ‘ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकमध्ये संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांकडून दि.१३ जुलै ते १४ जुलै २०२० या कालावधीमध्ये ‘ओ. ओ. एम.डी. विथ स्टार यु.एम.एल.’ या विषयावर ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न झाला.
जगभरातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्यावत असणे गरजेचे असते. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणत्याही प्रकल्पाच्या रचनेसाठी ‘युनिफाईड मॉडेलिंग लॅग्वेज’ अवगत असणे गरजेचे आहे. हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा विनामूल्य आयोजित करण्यात आली होती. स्वेरी विविध बौद्धिक उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा ऑनलाईन ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला. या कार्यशाळेमध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व तेथील प्राध्यापक वर्ग यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डॉ. सोमनाथ ठिगळे, असोसिएट प्रोफेसर, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर यांनी ‘युनिफाईड मॉडेलिंग लॅग्वेजचा वापर करून ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलिंग अँड डिझाईन कसे करावे?’ याबद्दल माहिती दिली. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. सोमनाथ ठिगळे यांनी कोणत्याही प्रकल्पाच्या रचनेसाठी आवश्यक असणाऱ्या ‘यु.एम.एल. डायग्रॅम कशा काढाव्यात’ याचे ऑनलाइन प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर ऑनलाईन कार्यशाळा ही प्रत्येक दिवशी दोन तास जीटसी मीट अॅपद्वारे व युट्युब लाईव्ह या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आली. त्याचबरोबर सहभागींकडून प्रत्येक सत्राच्या संबंधित ऑनलाइन प्रश्नावली देखील सोडण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये सहभागी सदस्यांनी आपले अभिप्राय व्यक्त केले. यामध्ये सचिन अरुण ठाणेकर (वडेश्वरम, गुंटूर, ए.पी.), सुमिता देबनाथ (होजाई), शर्मिला (उडुपी), सुजाजी पी. (कन्याकुमारी), डॉ.एस.शिबा ग्लादीस (थोलयावट्टम, कन्याकुमारी), मनोजकुमार चौरस (ग्रेटर नोएडा, गौतम बुद्ध नगर), तारांदीपकौर भाटिया (ऑस्ट्रेलिया), डॉ. लक्ष्मी प्रसन्न वेदना (कुकतपल्ली), प्रबावधी जी (पुडुचेरी), शोभा उमेश (गाझियाबाद) यांच्यासह देश व विदेशातील सुमारे २५० हुन अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. ऑनलाइन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे निमंत्रक व संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञानाचे विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. वैशाली खंडागळे, प्रा. महेश जाधव, प्रा. चैताली गुंड, प्रा. विद्या मस्कर व प्रा. मोनाली घाडगे यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. अवधूत भिसे यांनी या कार्यशाळेचे प्रस्ताविक केले तर संगणक विभागाचे प्रमुख प्रा.अमेय भातलवंडे यांनी आभार मानले.






