Maharashtra

उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपुर शहरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेघर निवास, पत्राशेड स्मशानभूमी येथील बेघरलोकांना शिवसेना विभाग प्रमुख मा. तानाजी मोरे यांचे मार्फत मास्क वाटप, केळी वाटप करण्यात राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. संत पेठ भागात युवासेना शहर समन्वयक मा.अमित गायकवाड यांच्या तर्फे मोफत शिवभोजन ही देण्यात आले आहे. आशा प्रकारे पंढरपुर शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आज प्रचंड उत्साहात विविध समाजउपयोगी उपक्रमांनी साजरा केला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख मा. रविंद्र मुळे, शिवसेना उपशहर प्रमुख मा. लंकेश बुराडे, मा. विनय वनारे, मा. सचिन बंदपट्टे, शिवसेना विभाग प्रमुख मा. तानाजी मोरे, पंकज डांगे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपशहर अध्यक्ष मा. दादा थिटे, मल्हार आर्मी चे पंढरपुर शहर अध्यक्ष मा.संतोष बंडगर तसेच बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button