Maharashtra

देशभक्ती आणि राष्ट्रभावना जागृत करणारा मनपा च्या साईबाबा शाळेचा “बालदीन ” बाळगोपाळांच्या सहवासात संपन्न …!

देशभक्ती आणि राष्ट्रभावना जागृत करणारा मनपा च्या साईबाबा शाळेचा “बालदीन ” बाळगोपाळांच्या सहवासात संपन्न …!

मिलिंद जाधव

मनपा शाळा साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल (एज्यूको) संचालित १४ नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान आणि बालगोपाळांचे लाडके आणि आवडते पंडित जवाहरलाल नेहरू (चाचा नेहरू) यांचा जन्मदिवस “बालदीन ” म्हणुन शाळेतील शिक्षक आणि बालगोपाळ विद्यार्थी यांच्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. “बालदीन ” साजरा करण्यामागे उद्देश एकच की शालेय उपक्रमांच्या विविध माध्यमातून विद्यार्थी हा आपले आयुष्य समृद्ध आणि गतिमान कसा करू शकेल त्याच बरोबर शालेय जीवनात त्याला मिळालेली संधी , अनुभव , रूजलेले संस्कार आणि मूल्य ही व्यक्तीसोबत कायम रहावीत या ढ्रुढ विश्वासातुनच विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे, त्यांच्यात मूल्ये रूजवावी हे उद्देश डोळ्यासमोर ठेवुन गुरुवार दिनांक १४ नोव्हेबर हा बालदीन म्हणुन साजरा करण्यांत आला. या महत्वाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेच्या मूल्यां बाबतीत चर्चा करतात.आणि अशाच उपक्रमातुन मुलांसाठी सभाधिटपणा , आपले मत मांडण्यासाठीची संधी वक्तृत्व गुणांसाठी शाळे तर्फे मंच खुला करण्यांत येतो आणि या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तिने प्रत्येकाच्या अंगी देशभक्ती आणि राष्ट्रभावना जागृत व्हावी या हेतुपुरस्सर ज्या देशभक्तांनी स्वातंत्र प्राप्तीसाठी आपले बलिदान दिले त्यांच्या विविधरूपी व्यक्तिरेखा साकारून
रसिक प्रेक्षकांची माने जिंकून घेतली , तर काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वीर रागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, प्रथम महिला आंतराळवीर कल्पना चावला, वीरमाता जिजाऊ, थोर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम, महात्मा ज्योतीराव फुले, आनंदीबाई गोपाळ, तसेच देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांची चरित्र गाथा गाऊन प्रत्येकाच्या मनांत राष्ट्रप्रेम आणि देशभावना जागृत केली याप्रसंगी प्रमुख अतिथी सिने-नाट्य अभिनेते मा.सुरेश डाळे-पाटील, एज्यूको संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मिनल श्रीनिवासन, बोर्ड सदस्या श्रीमती रेखा खंडूरी , शिवानी कनकिया मॅडम, सुप्रिया सुर्यवंशी, मा.विशाल सर (D.B.),सचिन भेरे, ह्रिषिता पेडणेकर, श्रेया जाखमोला मॅडम, सर्वश्री.महेश पालकर (E.O.),केशव आर्य (A.O.) मांजरेकर मॅडम, उषा बागल टीचर, आश्विनी पोटे टीचर, सीमा पाटील टीचर तसेच SMC अध्यक्ष मा.संतोष तानावडे, सौ.सुमनजीत कौर, सचिन शिंदे, महेश्वर तेटांबे , श्री गोसावी , सौ.सविता सरतापे, वैष्णवी कदम, योगेश साळवी सर, आदी शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.प्रमुख अतिथी सुरेश डाळे तसेच मांजरेकर मॅडम आणि मिनल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालदीनाचे महत्व पटवून दिले तर उषा बागल यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे हा बालदीन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी टीचर तबस्सुम शेख आणि फरहीन शेख यांनी विशेष मेहनत घेतली.अशा तऱ्हेने “बालदिन ” हा दिवस बालगोपाळांच्या सहवासात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button