Paranda

गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट

गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि. २४

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या सण म्हणजे गुढीपाडवा मराठी महिन्याचे नवीन वर्षाच्या सुरुवातीचा सण म्हणून गुढीपाडव्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

तालुक्यातील जनतेसाठी कोरोना करणाऱ्या विषाणू पासून फैलाव होणाऱ्या संकटामुळे महत्वाचा असा मानला जाणारा सण व साडेतीन मुहुतापैकी एक महत्वाचा मुहुर्त म्हणजे गुढीपाडवा या गुडीपाडव्यावर कोरोनाचे सावट दिसुन येणार आहे.

गुढीपाडव्याने मराठी वर्षाची सुरुवात केली जाते. आनंदाचा, उत्साहाचा या सणावर कोरोनामुळे जनतेचा संपर्क व भेटीपासून दुर राहावे लागणार आहे.

दारामध्ये बांबूची काठी घेऊन त्यास वरच्या टोकाला साडी वस्त्र परिधान करून वरती ताब्या, लिंबाची फांदी, आंब्याचे पानाफुलांचा हार, साखरेचा हार घालून दारासमोरील मोकळी जागा स्वच्छ करून गुढी उभा केली जाते व रांगोळी काढून पूजा केली जाते.फक्त ऑनलाईन शुभेच्छा देऊन एकमेकाची काळजी घ्या असे संदेश देऊन गर्दी टाळुन सणाचा आनंद घरी बसून साजरा करण्याची वेळ कोरोनामुळे आली आहे शासनाचे आदेश पाहून थोडी खुशी थोडी गम करीत गुढीपाडवा साजरा करावा लागणार आहे आर्थिक नियोनाचीही कसरत करावी लागत आहे याचा परिणाम व्यापारी वर्गा वर दिसुन येत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने जनजागृती चालू केली आहे. हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, कामाशिवाय बाहेर न पडणे

मास्कचा वापर करणे व डॉक्टरचा सल्ला घेणे आदी विषयी जनजागृती केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button