Pune

रायगङचे काम हे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतूत्वाखालीच झाले पाहीजे मूख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगङचे काम हे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतूत्वाखालीच झाले पाहीजे

मूख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे दत्ता पारेकर

रायगड किल्ला परिसरातील कामांमध्ये कसलाही भ्रष्टाचार चालू देणार नाही आणि कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नाही ही भूमिका घेऊन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की राजे, रायगड चे काम हे आपल्याच नेतृत्वात झाले पाहिजे ही केवळ माझीच इच्छा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची मागणी आहे. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धना साठी प्रयत्न करत आहात. तुमची महाराजांच्या किल्ल्यांबद्दल असलेली आत्मीयता आम्ही सर्व जण जाणतो. तुम्ही तिथे आहात म्हणून सर्व काही सुरळीत चालू आहे. तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. फक्त तुम्ही राजीनामा देऊ नका. यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं की पूर्वीच्याच जोमाने किंवा त्यापेक्षा जास्त ताकदीने किल्लेसंवर्धन करत राहीन.

यावेळी मी सारथी संस्थेच्या स्वायत्तेसाठी आग्रही मागणी केली. मराठा समाजातील हजारो युवकांना या संस्थेचा थेट लाभ होत आहे. समाजातील येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवण्याचे कार्य यामाध्यमातून होणार आहे. आणि त्या संस्थेच्या स्वायत्ततेवर कुणीतरी एक हेकेखोर अधिकारी घाला घालण्याचा प्रयत्न करतो हे ठीक नाही. याबाबत सर्व माहिती मी त्यांना दिली. परिहार साहेबांना कायम ठेवण्याचीही मागणी केली. त्यांनी याबाबतही सकारात्मकता दाखवत तात्काळ निर्णय करण्याचा शब्द दिला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लगेच याबाबत निर्णय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात असलेल्या लढ्यात पूर्वीच्याच वकिलांना ठेवण्याची मागणी केली. मी स्वतः प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर असतो. आणि आपली केस व्यवस्थित चालू होती त्यामुळे, वकील तेच ठेवावेत. यावर त्यांनी विश्वास दिला की कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाच्या लढ्यात कमतरता ठेवली जाणार नाही. पूर्वीपेक्षाही जास्त ताकदीने आपण सर्वजण हा लढा लढू असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button