Chopda

११ मे महात्मा दिन” पुस्तके वाचून साजरा करावा

११ मे महात्मा दिन” पुस्तके वाचून साजरा करावा

११ मे १९८८ रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ज्योतिबा फुलेंना समाजसुधारनेच्या महान कार्यामुळे भारत देशातील पहीली “महात्मा” हि पदवी प्रदान केली. तेव्हा पासून आपण “महात्मा ज्योतीबा फुले” असा उच्चार करतो त्यांच्या नावापुढे “महात्मा”हि पदवी लावतो.

म्हणूनच(२०१६) या वर्षांपासुन ११ मे हा दिवस ” महात्मा दिन ” म्हणून साजरा व्हावा, यासाठी श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, मा.श्री. सचिनभाऊ गुलदगड साहेबांनी प्रयत्न सुरु केले आहेत, आपण सगळे फुलेप्रेमी मिळुन यासाठी लवकरच या विषयावर जनआंदोलन उभारुयात.

आपण सर्वजन “महात्मा दिन”साजरा करणारच आहोत, इतरानांही साजरा करायला सांगुयात, आणि महात्मा दिनाचे महत्व पटवून देवू आणि आपआपल्या भागातील तहसील, जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून व्यापक स्वरूपात प्रशासकीय स्तरावर “महात्मा दिन” साजरा होण्यासाठी प्रयत्न करू, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड यांनी केले.

परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडावूनच्या काळात आपण ११ मे २०२० रोजी “महात्मा दिन” घरातच थांबून फुलेंची पुस्तके वाचून, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून साजरा करावा,असे श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य चे खानदेश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष संध्याताई नरेश महाजन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भगवान माळी जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी शहर अध्यक्ष दशरथ महाजन तालुका अध्‍यक्ष राजू भाऊसाहेब जय बजरंग बिल्डर्स अँड डेव्हलपर यांचे मालक दिपक श्रावण माळी चोपडा तालुका उपाध्यक्ष अल्केश माळी रोहित माळी महेंद्र माळी विठ्ठल माळी रोहित माळी राहुल माळी मयूर माळी समाधान माळी महेंद्र माळी राहुल माळी राकेश माळी गौरव माळी प्रदीप माळी तालुका संपर्क प्रमुख समाधान प्रभाकर माळी यांनी अवाहन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button