अक्कलकोट नगरपरिषदेच्या भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराविरुद्ध नगरसेवकांनी आमरण उपोषण
कृष्णा यादव, अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट नगरपरिषदेच्या भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराविरुद्ध नगरसेवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्या सर्व नगरसेवकांना रिपब्लिकन #पार्टी ऑफ इंडिया( आठवले) गटाच्या वतीने आर पी आय तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या आदेशाने जाहीर पाठींबा देण्यात आले. यावेळी उपोषणकर्ते नगरसेवक आलम चाचा कोरबू , नगरसेवक विक्रम(बाळासाहेब) शिंदे प्रा.राहुल रुही, नगरसेवक विनोद मोरे, समाजसेवक नागराज कुंभार, समाजसेवक बंटी राठोड, नगरसेवक पुकाळे, नगरसेवक आंबूबाई कामनूरकर, नगरसेवक कांतू धनशेट्टी, प्रहारचे शहर अध्यक्ष अमर शिरसाट, निशांत निंबाळकर, RPI शहर अध्यक्ष प्रसाद माने, युवक अध्यक्ष अप्पा भालेराव आदी उपस्थित होते. वरील सर्व विषयांचे व आरोग्य विभागाचा चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोठा जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आरपी आय नेते प्रा राहुल रुही यांनी दिले.






