प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी विलंब कमी करण्याची गरज – न्यायमुर्ती जाधव
सुरेश बागडे
परंडा ( सा.वा )दि १२
न्यायदान प्रकरणातील ऑन डुटी होणारा विलंब जानिव पुर्वक कमी केल्यास प्रलंबीत प्रकरणातील निपटारा करण्यास गती मिळेल या साठी न्यायाधिस , कर्मचारी व वकीलांची जबाबदारी आहे असे मत औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व्ही.के जाधव यांनी परंडा येथे बोलताना व्यक्त केले .
परंडा येथिल वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या नुतन ईमारतीचे उदघाटन रविवार दि .१२ जानेवारी रोजी न्यायमुर्ती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी बोलत होते .
यावेळी जाधव म्हणाले की सोशल मीडीया खुप परिनाम कारक माध्यम आसुन याचा तरूणांनी योग्य वापर केला पाहिजे कोनाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असुन या साठी पालकांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे बोलताना सांगीतले .
या वेळी व्यासपिठावर जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती एस .एम शिंदे , वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश एस .जी बावकर , बॉर कौसीलचे सदस्य अॅड मिलींद पाटील विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष व्ही, डी देवकर उपस्थित होते .
परंडा विधीज्ञ मंडळाच्या पाठपुराव्या मुळे २०११ साली परंडा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यात आले होते मात्र स्वतंत्र ईमारत नसल्याने न्यायालयाच्या जुन्या ईमारती मध्ये कामकाज सुरू होते ईमारत बांधकाम साठी ५ कोटी रूपये खुर्चन सुसज्ज अशी ईमारत बांधण्यात आली आहे .
या उदघाटन सोहळ्यास आमदार सुजित ठाकुर नगर अध्यक्ष जाकीर सौदागर तसेच शहरातील राजकीय , सामाजिक , व्यापारी क्षेत्रातील मान्यवर तसेच
भुम , तुळजापुर , कळंब येथिल वकील संघाचे अध्यक्ष सदस्य मोठया संखेने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड संतोष सुर्यवंशी यांनी केले तर अभार अॅड देवकर यांनी मानले.






