परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन तर्फे गरजूना अन्नधान्य किटचे वाटप
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हाथ घ्यावे
असाच काही ओळीला साजेल असा उपक्रम! देश सध्या साथीच्या आजाराशी दोन हाथ करत आहे. अशा परिस्थितीत मध्ये ज्या मजुर कामगार वर्गाचे ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा लोकांच्या परिस्थिती चे भान ठेवून आणि सामाजिक बांधिलकी जपत, परंडा शहरात सराफ आणि सुवर्णकार असोसिएशन ने पुढाकार घेऊन मदतीचा हाथ देऊ केला आहे…
दिनांक ०३ एप्रिल रोजी परंडा शहरात सराफ असोसिएशन तर्फे शहरातील गरीब,मजूर आणि कामगार लोकांना रोज लागणाऱ्या धान्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये तांदूळ, डाळ, तेल आशा वस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी परंडा शहराचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद व संघटनेचे आजी-माजी अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






