सुरगाणा तालुक्यातील हातगड येतील महिंद्रा क्लब यांचा चांगला उपक्रम निमित्त महिंद्रा क्लब यांना झाले 75 वर्ष पूर्ण
विजय कानडे
देशाच्या काना कोपऱ्यात महिंद्रा क्लब च्या शाखा आहे तसेच सुरगाणा तालुक्यातील हातगड येते निसर्गाच्या सानिध्यात वसलेले महिंद्रा क्लब रिसॉर्ट आहे यांच्या उद्योगामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो तसेच महिंद्रा क्लब हातगड नेहमी सामाजिक अग्रेसर असतात त्यांनी सुरवाती पासून त्या परिसरात अनेक उपक्रम राबविले कोरानाच्या काळात गरीब लोकांना आरोग्य शिबीर राबवले,वृक्षारोपण, मेडिकल कॅम्पस,आश्रम शाळा येतील विद्यार्थी वर्गाला मोफत पुस्तके वाटप ,छोटे छोटे प्रकल्प राबवणे परिसरातील गावांना गावकीची विहीर बांधून दिल्या तसेच 2 ऑक्टोबर गांधी सप्ताह म्हणून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले तसेच हे उपक्रम राबवत असताना गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा किंवा रुग्ण घेऊन जाण्यासाठी अंबुलन्स आज राजा हरीचंद्र मित्र परिवार यांना भेट दिली या सर्व उपक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी अमित राजहंस (महिंद्रा क्लब हातगड रिसॉर्ट मॅनेजर),प्रवीण यादव,पंकज कुमार,जितेंद्र कुमार,शत्रुधन दीक्षित भट्ट ,सोमनाथ कदम सर्व व्यवस्थापन कर्मचारी उपस्थित होते आणि तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे उधोग धंदे करत असताना आदिवासी जनतेला मदतीला धावून जातात.






