Amalner

इंस्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल…

इंस्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल…

अमळनेर:- इंस्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट खाते उघडून महापुरुष यांची आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी जनक मजकूर टाकण्यात आला होता. फिर्यादीने सदर बनावट खातेधारकास मेसेज केला असता सदर खाते धारकाने शिवीगाळ केल्याने फिर्यादीने समाज बांधवांच्या कानावर ही गोष्ट टाकल्याने ऍड. प्रशांत संदानशीव, संदीप सैंदाणे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, प्रवीण बैसाणे, बाळा संदानशीव, धनंजय साळुंखे, पवन संदानशीव, आकाश महाले, विक्की शिरसाठ आदीनी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करावा याकरिता निवेदन दिल्याने फिर्यादी प्रभाकर नाईक यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात कलम २९५, व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व समाजबांधवांनी अमळनेर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व कर्मचारी यांचे आभार मानत सत्कार केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button