Maharashtra

काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस व महसूल विभागाला कोरोना संरक्षक किट चे वाटप

काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस व महसूल विभागाला कोरोना संरक्षक किट चे वाटप

प्रतिनिधी सुनिल घुमरे

नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी तालुक्यात
कोरोनाचा बचाव करण्यासाठी महसूल विभाग, पोलीस कर्मचारी व आरोग्य विभाग व पत्रकार हे अहोरात्र झटत असुन .सामाजिक बांधिलकी म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने दिंडोरी येथील पोलीस स्टेशनमधील कर्मचारी, प्रांत कार्यालय , तहसील कार्यालय व वर्तमान पत्राचे तालुका प्रतिनिधी ना कोरोनाच्या संरक्षक किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शैलेश पवार, काँगेस चे तालुका अध्यक्ष सुनील आव्हाड,कार्याध्यक्ष वाळू पाटील जगताप, काँगेस पक्ष्याच्या जिल्हा उपाध्यक्ष सुमित्राबाई बहिरम, जेष्ठ नेते गुलाबतात्या जाधव, गौरव जैन, प्रवीण कासार, नगरसेविका शैला उफाडे, निकिता बावा, प्रितम देशमुख, सचिन आव्हाड, दिलीप देशमुख, नितीन आव्हाड आदी काँगेस कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. प्रांत कार्यालयात प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी, तसेच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनी तर पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष कल्याणराव आवटे व तालुका अध्यक्ष संतोष कथार यांनी किट चा स्वीकार केला.
यावेळी विविध दैनिकाचे सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो- जिल्हा काँग्रेस च्या वतीने दिंडोरी प्रांत कार्यालयात तहसीलदार कैलास पवार यांना कोरोना संरक्षक किट चे वाटप करतांना शैलेश पवार, सुनील आव्हाड, वाळू पाटील जगताप आदी व पोलीस कर्मचारी बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button