वहानगाव व भिवकुंड ग्राम पंचायत मधील अवैध ठरणाऱ्या उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार यांचे अभय
निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार यांचे वर कारवाई करून निलंबन करण्याची मागणी
ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर
चिमूर : वहानगाव व भिवकुंड ग्राम पंचायत मधील उमेदवार वैभव थुटे व करिष्मा मांडवकर यांनी हेरा फेरी दस्ताऐवज केल्याने उमेदवारांचे उमेदवारी अर्ज राजकीय दबावात वैध केल्याचा आरोप करीत याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात आली असून विशिष्ट राजकीय पक्षाच्या उमेदवारास वलय देणाऱ्या तहसीलदार सूर्यवंशी व निवडणूक निर्णय अधिकारी योगेश वासनिक यांचेवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषद मधून मनसे तालुका अध्यक्ष प्रशांत कोल्हे केली आहे .
या पत्रकार परिषद ला नितेश गायकवाड ,चेतन कोल्हे, गणेश कारेकर , भिवकुंड ग्राम पंचायतचे उमेदवार कु सपना वाल्मिक दोहतरे मंगेश ठोंबरे अमोल तराळे आदी उपस्थित होते.
वहानगाव ग्राम पंचायत प्रभाग १ मधील वैभव ज्ञानेश्वर थुटे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला असता शौचालय संदर्भात प्रशांत कोल्हे यांनी आक्षेप घेतला होता आक्षेपात वैभव थुटे यांनी आपल्या अर्जात शौचालय घोषणापत्रात वडिलांच्या मालकीचे असल्याचे नमूद केले तेव्हा प्रशांत कोल्हे यांनी उमेदवारास शौचालय नसल्याचा आक्षेप घेत वैभव थुटे चा उमेदवारी अर्ज अवैध करण्याची मागणी करीत आक्षेप घेतला निवडणूक निर्णय अधिकारी योगेश वासनिक यांनी दि ३१डिसेंबरच्या ५ वा नंतर निर्णय देण्याचे सांगितले त्यानंतर वैभव थुटे यांनी त्यांचे मोठे वडील यांचे नावाचे शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे ५.४५ वा सादर केले असताना त्या शपथपत्र मध्ये वैभव थुटे हा माझा पुतण्या असून माझ्या शौचालयाचा वापर करीत असल्याचा नमूद आहे . वैभव थुटे यांनी प्रथम घोषणा पत्रात शौचालय माझ्या वडिलांचे मालकीचे नमूद केले होते त्यानंतर सदर नामांकन अर्जाला मोठे वडिलांचे शपथपत्र जोडून स्वत च्या वडिलांस शौचालय नसल्याचे सिद्ध होते यावरून घोषणा पत्रात खोटी माहिती दिल्याचे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार यांना लेखी तक्रार करून माहिती दिली त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी वासनिक यांनी ४ दिवसांनी निर्णय देण्याचे सांगितले
भिवकुंड ग्राम पंचायत मधील करिष्मा दिनेश मांडवकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज सादर केला असता ग्राम पंचायत सचिवांनी करिष्मा मांडवकर कडे शौचालय नसल्याचे प्रमाणपत्र दिले त्यावर सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध होत असताना वैध कसा झाला यावर सुद्धा आक्षेप उमेदवार कु सपना वाल्मिक दोहतरे यांनी केला असून सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यावर टाळाटाळ करीत आहे.
ग्राम पंचायत वहानगाव चे उमेदवार वैभव थुटे व भिवकुंड चे उमेदवार कु करिष्मा मांडवकर यांची उमेदवारी अर्ज वैध करीत राजकीय दबावात अभय देणाऱ्या निवणूक निर्णय अधिकारी योगेश वासनिक व तहसीलदार सूर्यवंशी यांच्यावर निलंबन करण्याची मागणी मनसे तालुका अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी केली असून जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करण्यात आली असून न्याय न मिळाल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
प्रतिक्रिया
तहसीलदार सूर्यवंशी*
वहानगाव व भिवकुंड ग्राम पंचायत मधील आक्षेप उमेदवार संदर्भात तहसीलदार सूर्यवंशी म्हणाले की तालुक्यातील निवडणूक प्रकिया ग्राम पंचायत अधिनियम व निवडणूक निर्णय आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक होत असून २० निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक करण्यात आले असून तक्रारकर्त्यांनी निर्णय मान्य नसल्यास त्यांनी न्यायालयात दाद मागावी* .
निवडणूक निर्णय अधिकारी
योगेश वासनिक
दि ३१ डिसेंबर ला सर्व ५ ग्राम पंचायतच्या उमेदवारी अर्ज छाननी करीत असताना वहानगाव ग्राम पंचायत चे उमेदवार प्रशांत कोल्हे व वैभव थुटे याच्या अर्जाची छाननी करून वैध ठरविण्यात आले या वेळी वैभव थुटे व करिष्मा मांडवकर या उमेदवार यांना शौचालय नसल्याबाबत आक्षेप घेतले असता कोल्हे यांनी माझ्यावर दबाव आणू लागले यामुळे गोंधळून गेलो अर्जाची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि स्वयंघोषणा पत्राच्या आधारे वैध ठरविण्यात आले तसेच सपना दोहतरे यांना त्याच्या आक्षेप अर्जाच्या जोडलेले ग्रा प सचिव चे प्रमाणपत्र ची पाहणी केली असता सचिवांच्या प्रमाण पत्रावर जावक क्र नव्हते व सदर प्रमाण पत्र हे सचिवा नेच दिले किंवा नाही इतक्या कमी वेळात ठरविणे शक्य नव्हते त्यामुळे प्रशांत कोल्हे व सपना डोहतरे यांनी केलेले आरोप निराधार आहे*






