प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक पार पडली.
राहुल साळुंके धुळे
धुळे : आज प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथे रुग्ण कल्याण समिती(RKS) वार्षिक बैठक पार पडली ह्यावेळी शिरपूर पंचायत समिती सभापती श्री.सत्तरसिंग पावरा, रुग्ण कल्याण समिती(RKS)च्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या श्रीमती जताबाई रमण पावरा, सामाजिक तळमळ असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री.रमणभाऊसाहेब पावरा ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
तत्पूर्वी सर्व प्रमुख उपस्थितांचे सत्कार व आभार प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.निलिमा देशमुख, डॉ.सुनील पावरा, डॉ.चेतना महाले, डॉ.हिरा पावरा, डॉ.अनंत पावरा, डॉ.महेश पावरा, डॉ.सौ.किरण पाटील ह्यांच्यामार्फत करण्यात आले. ह्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला सलग्न असणारे उपकेंद्रात नवीन पदभार घेतलेले समुदाय वैद्यकीय अधिकारी (CHO) ह्यांचे प्रमुख पाहुण्यांनी सत्कार केला.
ह्यावेळी येत असणाऱ्या अनेक समस्यांवर व त्यावरील उपाययोजनांवर तोडगा काढण्याबद्दल चर्चा करण्यात आली तसेच सभापती श्री.सत्तरसिंग पावरा व रमण पावरा ह्यांनी अनेक विषय व त्यांवरील उपाययोजना आपल्या मनोगतातुन व्यक्त केले .
ह्यावेळी सुत्रसंचलन डॉ.हिरा पावरा ह्यांनी केले व आभार औषधनिर्माणअधिकारी श्री.शाम पावरा ह्यांनी केले.






