पंढरपूर तालुक्यातील खर्डी व आसपासच्या गावातील शेतकरी महावितरणच्या वीज वसुली धोरणाने हैराण लोकप्रतिनिधीही देईनात लक्ष
प्रतिनिधी:
रफिक अत्तार
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत, परंतु महाराष्ट्रातील अनेक भागात शेतकऱ्यां विरोधात महावितरणने शेतीपंपाचे विज बिल भरा अन्यथा ट्रांसफार्मर सोडूवू असा तगादा लावल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे.याचाच भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी ट्रांसफार्म सोडवण्याचे धोरण आखले आहे. पंढरपुर तालुक्याला पाच आमदार असूनसुद्धा शेतकरी वाऱ्यावरच का असा सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून खडा सवाल विचारण्यात येत आहे.याचेच उदाहरण तालुक्यातील खर्डी हे जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांचे जन्मगाव असून याच गावात महावितरणचे अधिकारी नायकुडे यांनी युद्धपातळीवर ट्रांसफार्मर सोडवण्याचे काम सुरू केले आहे.
याकडे लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजेचे आहे. विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे यांना भ्रमणध्वनीवरून याबाबत कैफियत मांडली असता त्यांनी महावितरणचे अधिकारी आमचं ऐकत नाहीत आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगून हात झटकले, त्यामुळे जर लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले तर दाद मागायची कोणाकडे असा सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून चर्चेचा विषय बनला आहे. जागतिक महामारी मुळे शेतीमाल कवडीमोल विकला जात आहे, त्यातच निसर्गाचा लहरीपणा महापूर, अतिवृष्टी यामुळे कोणतेही पीक केले तरीही शेतकऱ्याला केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आलेला असताना महावितरणने अशाप्रकारे वीज वसुली थांबली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांमधून उग्र स्वरूपात प्रतिक्रिया उमटत आहेत.






