सोलापूर जिल्हापरिषद अध्यक्षपद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का..
दत्ता पारेकर
पुणे — दत्ता पारेकर प्रतिनिधी पुणे जिल्हा
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड चूरस निर्माण झाली असून भाजप आघाडीकडून अध्यक्षपदासाठी करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील गटाचे अनिरुद्ध कांबळे तर महाविकास आघाडीकडून माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे सदस्य त्रिभुवन धाईंजे व पंढरपूर तालुक्यातील अतुल खरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी भाजप आघाडीचे दिग्गज नेते हजर होते तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या केवळ उमेदवारांनी येऊनच आपले अर्ज दाखल केले.
माजी आमदार नारायण पाटील यांनी आपली पुर्ण ताकद पणाला लावून विजयश्री खेचुन आणली.. विशेष म्हणजे अनिरुद्ध कांबळे हे धनुष्य बाण या चिन्हावर निवडुन आले होते. या निवडीचे करमाळा तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले .. करमाळा तालुक्याला तब्बल १५ वर्षेनी अनिरुद्ध कांबळे यांच्या रुपाने अध्यक्ष मिळाले आहेत.
अध्यक्ष निवडणूक:
अनिरुद्ध कांबळे-37
त्रिभुवन धाइंजे-29
विजयी-अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष
उपाध्यक्ष निवडणूक:
दिलीप चव्हाण -35
बाळराजे पाटील -31
विजयी- दिलीप चव्हाण 4 मतांनी