Dhule

मतदार संघाच्या विकासासाठी सत्तेतला आमदार निवडून द्या — खासदार उन्मेश पाटील

मतदार संघाच्या विकासासाठी सत्तेतला आमदार निवडून द्या — खासदार उन्मेश पाटील

कापडणे(धुळे ग्रामीण) येथील जाहीर सभेस प्रचंड गर्दी
महायुतीचे माईसाहेब धुळे ग्रामीण च्या पहिल्या आमदार होणार !

मनोज भोसले
कापडणे — धुळे ग्रामीण मतदार संघातील विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. गेल्या वेळी विरोधी पक्षाचा आमदार निवडून आला त्यामुळे सत्ता असूनही कामे झाली नाहीत ही बाब लक्षात घ्यावी.राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा सत्तारूढ होणार असून सत्तेतला आमदार निवडून द्या. धुळे ग्रामीण मतदारसंघाचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही खासदार उन्मेश पाटील यांनी दिली. भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर पाटील यांच्या प्रचारार्थ आज कापडणे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खलाने, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिवसेना विभाग प्रमुख उजवल बोरसे, सेनेचे राजेंद्र माळी,माजी सरपंच मधु नाना पाटील, माजी सरपंच गुलाब आप्पा पाटील ,महिला आघाडीच्या मंदाताई माळी, ग्रामपंचायत सदस्य बटू आबा पाटील ,प्रगतिशील शेतकरी शंकर माळी ,नगरसेवक हिरामण आप्पा गवळी, माजी उपसरपंच बन्सीलाल धोबी ,महिला मोर्चाच्या लताबाई चौधरी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भामरे, सतीश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, सरपंच सुनील शिंदे, धनुरचे सरपंच प्रवीण पाटील, पंचायत समितीचे मुकेश पवार यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे पाटील उपस्थित होते. खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की कापडणे गावाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अक्कलपाडा धरणातून पाटचारी करून गोंदुर तलाव भरणे,तेथून देवभाने धरण भरता यावे.या संदर्भात येत्या काळात प्रयत्न केले जातील. देवभाने धरणाचा डावा कालवा सुरू करणे,कापडणे ते सोनगीर रस्ता डांबरीकरण करणे, तरसोद ते न्याहळोद रस्ता डांबरीकरण करणे, कापडणे येथे भव्य सभागृह बांधणे,स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणे अशा अनेक महत्त्वाची कामे कापडणे परिसरात प्रलंबित आहेत येत्या काळात राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीचेे सरकार निवडून येणार आहे.मात्र गेल्यावेळी केलेली चूक यावेळी करू नका सत्तेतला आमदार निवडून द्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून या मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. याकरिता माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर पाटील या धुळे ग्रामीण मतदार संघाच्या पहिल्या आमदार म्हणून निवडून द्या असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी केले. नगरसेवक हिरामण आप्पा गवळी, भाजप तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा युवााा मोर्चा जिल्हाध्यक्ष राम भदाने पााटील यांनी मनोगत व्यक्त केले सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
——
नंदाणे सभेत महिलांची मोठी गर्दी
नंदाने — केंद्रातील नरेंद्र मोदीं साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील गेल्या पाच वर्षातील पारदर्शक कृतिशील सरकारचे कामाने जनता प्रभावित झाली आहे. महिलांसाठी उज्वला गॅस योजना असो वा महिलांसाठी बचतगटांच्या आर्थिक स्वयंपूर्ण करण्याची संधी असो राज्यातील सरकारने प्रामाणिक प्रयत्न केला असून आजच्या सभेला शेकडो महिलांची उपस्थिती ही माई साहेब यांच्या विजयाची नांदी असून गेल्यावेळी विरोधी पक्षाच्या माणसाला निवडून आपण केलेली चूक सुधारावी
सत्तेतला आमदार निवडून द्या असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. याप्रसंगी गावकऱ्यांकडून मान्यवरांवर पुष्प वृष्टी करीत जोरदार स्वागत केले. याप्रसंगी जेष्ठ नेते सुभाष देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button