Ahamdanagar

तिसगावच्या बिकानेर स्वीटहोम येथे शाळकरी मुले आणि हाँटेल व्यवसायीकांची मुले यांच्यात तुफान हाणामारी, पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये सहा जणाच्या विरोधात गुन्हा दाखल!

तिसगावच्या बिकानेर स्वीटहोम येथे शाळकरी मुले आणि हाँटेल व्यवसायीकांची मुले यांच्यात तुफान हाणामारी, पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये सहा जणाच्या विरोधात गुन्हा दाखल!

सुनिल नजन/स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहमदनगर/जिल्हा

शालेय विद्यार्थी आणि शाळा बाह्य विद्यार्थी यांच्या मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे जोरदार शीतयुद्ध सुरू आहे.व्रुध्देश्वर हायस्कूल चौकात शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींची छेडछाड झालेल्या प्रकरणाची शाई वाळतेन वाळते तोच पुन्हा हे प्रकरण उदभवले आहे.या नेहमीच्याच प्रकाराला पालक पुर्ण वैतागून गेले आहेत.एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटानी तिसगाव येथे नगररोडवर असलेल्या बालाजी बिकानेर स्वीट होममध्ये दोन गटात तुफान हाणामारी करीत दोन शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा बाह्य तरुणांनी जोरदार चोप दिला.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही हा संभ्रम पालक वर्गात निर्माण झाला आहे. या बाबतीत समजलेली माहिती अशी की पवन आव्हाड आणि असिफ पठाण यांचे ३१ आँगष्ट रोजी किरकोळ वाद झाले होते. त्यावेळी शिरापूरच्या किशोर सोपान बुधवंत आणि विशाल सुनिल कारखेले यांनी मध्यस्थी करून त्या वादातील भांडणाची सोडवा सोडवी केली होती.एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटानी किशोर बुधवंत आणि सुनिल कारखेले हे दोघे जण तिसगाव येथील नगररोडवर असलेल्या बालाजी बिकानेर स्वीटहोम मध्ये नाष्टा करीत बसलेले असतानाच तेथे संशयित आरोपी १)अरमान पठाण,२)सोहेल लालखाँ पठाण,३)अतिक पठाण,४) मोसिम शेख,५)आझाद पठाण,६)तोहिब असिफ सय्यद हे सर्व राहणार तिसगाव ता.पाथर्डी जि.अ.नगर हे तेथे आले आणि मागिल भांडणाचा राग मनात धरून त्यांनी किशोर बुधवंत आणि विशाल कारखेले यांना दमदाटी करत आणि अश्शील भाषेत शिविगाळ करीत लाथाबुक्यांनी जोरदार पणे मारहाण केली.त्यावेळी बालाजी बिकानेर स्वीट होमचे मालक यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवीले.त्यावेळी आरमान पठाण म्हणाला की तुम्ही मला परत भेटा मी तुम्हाला सोडणार नाही.अशा आशयाची फिर्याद शिरापूर ता.पाथर्डी येथील किशोर सोपान बुधवंत, आणि त्याचे वडील सोपान म्हातारदेव बुधवंत यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ८९९/२०२३ कलम १४३,१४७,१४९,३२३, ५०४,५०६,प्रमाणे वरील सहा जणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शेवगाव विभागाचे डी. वाय. एस. पी. सुनिल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आणि पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.तिसगाव हे अवैध धंद्याचे माहेरघरच बनले आहे.पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांना चांगला धडा शिकविल्यास गुन्हेगारी प्रव्रुत्तीच्या लोकांची पाळेमुळे नष्ट व्हायला काहीच वेळ लागणार नाही असे तिसगावच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button