सुरगाणा तालुक्यातील महत्वाचा आणि मुख्य रहदारी असलेला रस्ता म्हणजे बोरगाव -सुरगाणा-बर्डीपाडा
याच रस्याच्या विशेष दुरुस्ती साठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून खास १ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.*परंतु आमदार/खासदार यांच्या १०% च्या हट्टापाई सदर रस्त्याची दुरुस्ती वरच्यावर केली जात आहे*.खड्यातील माती साफ न करता किरकोळ डांबर फवारा मारुन खड्डे बुजवले जात आहेत.स्थानिक गावकरी जाब विचारण्यासाठी गेले असता ठेकेदार/मुकादम आणि संबंधित विभागाचे उप अभियंता,शाखा अभियंता उडवाउडवीची उत्तरे देऊन विषयाला बगद देतांना दिसले.
येत्या पावसाळ्यात तर ह्या रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन दैनिय अवस्था पहावयास मिळतात आहे.सुरगाणा तालुक्यातील नागरिकांन सह गुजरात राज्यातील पर्यटकांना या रस्त्याचा मोठा त्रास होणार आहे यात काही शंका नाही.उंबरठाण परिसरातील नागरिकांन मध्ये विद्यमान आमदार/खासदार यांच्या टक्केवारी पध्दतीवर खुपच तिरस्कार निर्माण झाला आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवू लागले आहे.






