Surgana

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने सुरगाणा तालुक्यात वीर सावरकर गौरव यात्रा

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने सुरगाणा तालुक्यात वीर सावरकर गौरव यात्रा

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकातून सोमवारी (दि. 3) सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एन. डी. गावित,w नंदू खैरनार, भरत भोये, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, जगदीश कानडे यांच्या उपस्थित होते.

सावरकर गौरव यात्रा बोरगाव, बुबळी, सुरगाणा, बा-हे, उंबरठाण, देवलदरी, भदर या ठिकाणी काढण्यात आली. गौरव यात्रेप्रसंगी आदिवासीचे पारंपरिक पावरी वाद्य वाजवत फेरी काढून सुरुवात करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान आहे. या योगदानाचे स्मरण करण्यासाठी व विरोधकांकडून सावरकरांचा वेळोवेळी अपमान करणाऱ्या वृत्तीला चपराक देण्यासाठी नाशिक जिल्हा भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.
या गौरव यात्रेप्रसंगी नगरसेविका जानकी देशमुख, हरिभाऊ भोये, तुळशिदास पिठे, शास्त्री गावित, रमेश गायकवाड, भाऊसाहेब पिठे, पंडित भोये, शिवाजी पवार, काजल गुंबाडे, गोविंदा गांगोडे, वामन गवळी, कल्पना भरसट, ललिता कुवर, मुरलीधर ठाकरे, चंद्रकांत भरसट, चंद्रकला गावित, शांताराम महाले, गुलाब पवार, अजित सहारे सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button