Pandharpur

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी
रफीक अत्तार

सांगोला:येथिल फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आदर्श शासक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते महाराजांच्या मुर्तीचे पूजन करून पुष्फहार अर्पण करण्यात आला. तसेच संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनीही महाराजांच्या मुर्तीस अभिवादन केले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा.टी. एन. जगताप, सांस्कृतीक विभागाचे समन्वयक प्रा.अमोल मेटकरी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल पोरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button