जनविकास मिल्क प्रोडक्ट, मोहा या दुध शितकरण व प्रक्रिया केंद्राचा शुभारंभ
सलमान मुल्ला कळंब
कळंब : मोहा ता.कळंब येथे जनविकास मिल्क प्रोडक्ट, मोहा या दुध शितकरण व प्रक्रिया केंद्राचा शुभारंभ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, तेरणा शे. स.सा.कारखान्याचे माजी संचालक उद्धव नाना मडके, मोहाचे उपसरपंच सोमनाथ मडके आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
युवकांनी उद्योग क्षेत्राकडे वळून स्वावलंबी बनले पाहिजे, श्री.मडके यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे. या उद्योगासाठी कर्ज पुरवठा केलेल्या मराठवाडा ग्रामीण बँकेचे कार्य सुद्धा सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सत्यासाठी खूप चांगली आहे. आपण सर्वांनी सहकार्य करून या फॅक्टरी ला दर्जेदार बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही आपल्या सोबत सदैव आहोत असा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला.
याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे रिजनल मॅनेजर श्री.आर.बी. कुरमुडा, जनविकास सामाजिक संस्था अध्यक्ष शरदचंद्र पवार, कळंब शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, माजी सरपंच श्री बाबा मडके, पं.स.सदस्य श्री प्रशांत घोंगडे, म.ग्रा.बँकेचे शाखा व्यवस्थापक अमर झाल्टे, श्रीराम मडके, कृषी विभाग लातूर मौलाना साहेब, संताजी वीर, देवदत्त पाटील, रमेश भिसे (केज), महेश नागटिळक, श्रीकांत शिंदे(नगर) दहिफळ सरपंच चरनेश्वर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, इस्माईल पठाण, गौर सरपंच श्याम देशमुख, शिंगोली सरपंच दौलतराव माने, बाभळगाव सरपंच आसाराम वाघमारे, महेंद्र कसबे, ग्रा.पं. सदस्य मारुती सर देशमुख यांच्यासह गावातील आणि पंचकृषीतील शेकडो नागरिक उपस्थित होते.






