Khirdi

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऐनपुर ग्रापचायत ने आशा स्वयंसेविका यांना साडी भेट देऊन केले सन्मानीत

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऐनपुर ग्रापचायत ने आशा स्वयंसेविका यांना साडी भेट देऊन केले सन्मानीत

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : खिर्डी येथून जवळच तालुक्यातील ऐनपुर येथे दि.१५/८/२०२१ रोजी सकाळी स्वातंत्र्य दिना निमित्त ऐनपुर ग्रापचायत चे सरपंच अमोल महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर बस स्थानक परिसरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास उपसरपंच दिपाली पाटील व ग्रा.प.सदस्या रुपाली अवसरमल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर जि.प.मराठी शाळेत उपसरपंच दिपाली पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रीय गीत होऊन ग्रा.पं.कार्यालय येथे kovid 19 च्या महामारीत स्वतः च्या जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागाच्या आशा स्वयमसेविका यांनी ऐनपुर येथील कोरोना पोझीटीव रूग्णानच्या घरी जाऊन सेवा दिल्या त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ग्रा.पं.व ग्रा.पं.कार्यकारी मंडळ यांनी आशा स्वयमसेविका यांना साडी व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमास सरपंच अमोल महाजन, उपसरपंच दिपाली पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे ,डॉ.संदीप चौरे, ग्रा.पं.सदस्य ,आशा स्वयमसेविका,ग्रा.पं.कर्मचारी,व ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button