प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत येणारे उपकेंद्र कोडीद, मालकातर, बुड़की येथे लसीकरण स्थळी खासदार डॉ.हिनाताई गावीत ह्यांची भेट व जनजागृती संवाद.
राहुल साळुंके धुळे
धुळे : प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत उपकेंद्र, कोडीद येथे लसीकरण स्थळी नंदुरबार लोकसभा खासदार डॉ.ताईसो हिनाताई गावीत, शिरपूर तालुका आमदार श्री.काशिरामदादा पावरा, शिरपूर वरवाडे नगरपालिका उपनगराध्यक्ष श्री.भूपेशभाई पटेल, जि.प.अध्यक्ष भाऊसो तुषारजी रंधे, पंचायत समिती सभापती श्री.सत्तरदादा पावरा, माजी भाजपा तालुकाध्यक्ष आबासो राहुल रंधे, सामाजिक कार्यकर्ते श्री.जयवंत पाडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री राजेन्द्र बागुल, वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.नीलमा देशमुख, पोलीस पाटील भरत पावरा, माजी जि.प.सदस्य दिलीप पावरा, माजी जि.प.सदस्य प्रकाश पावरा, सरपंच सोनिया पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, सरकारी वकील सुनील पाड़वी, संतोष पावरा, मोगेश पावरा, कांतीलाल पावरा, शमाताई पावरा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका अन्य प्रमुख मान्यवर ह्यांच्या उपस्थितीत ह्यांचे कोवीड लसीकरण जनजागृती साठी व लसीकरण स्थळी लोकांशी संवाद साधला.
तिसऱ्या लाटची पूर्वतयारी म्हणून *कोडीद* गावातील परिसरातील नागरिकांसाठी Covid Vaccination रोज लसीकरण शिबिर सुरू आहे.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा ह्यासाठी, तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून वरील सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी ह्यांच्या उपस्थितीत गावातील व परिसरातील लोकांसाठी जनजागृती, लसीकरण ही काळाची गरज आहे असे समुपदेशन करून व लसीकरण शिबिर आयोजित केले.
ह्यावेळी प्रस्तावना व समारोप उपकेंद्र,कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा व सुत्रसंचलन गौतम सोनवणे ह्यांनी केले.






