?Crime Diary…मुकटीत ठिबक चोरताना पकडले चोर…
राहूल साळुंके धुळे
धुळे : धुळे तालुक्यातील मुकटी येथील रहिवासी असलेल्या चोरांना पारोळा तालुक्यातील भोलाने शिवारात ठिबक चोरताना शेतकऱ्यांनी रंगेहात पडकले,यावेळी चोरी करणारे चोर हे गेल्या काही दिवसांपासून अमळनेर,पारोळा अशा शिवारात रात्रीच्या वेळेस ठिबक,जलपरी मोटारी चोरी करत असतात, काल रात्री भोलाने शिवारात चोरी करताना मुकटी येथील हेमंत पाटील (वय २२) गोपाल मराठे (वय २६) डिंगबर पाटील (वय २३ ) सुनील भोई (वय २३) या चोरट्यांचा शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले,चोरी करण्यासाठी रात्रीच्या वेळेस सुनावा साधत गाडीवर हिंडत असतात,व पारोळा अमळनेर शिवारात चोरी केल्याचे देखील त्यांनी कबूल केले आहे,याबाबतीत पुढील कार्यवाही सुरू आहे,






