प्रभाग क्रं. ८ मध्ये विविध विकास कामांचा समावेश करा – सौ. लीना निलेश काटे..!
अजहर पठाण धुळे
धुळे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत प्रभाग क्रं ८ मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कटीबद्ध असून नागरी सुविधांसाठी संपर्क करण्याचे केले आवाहन..!
(धुळे दि. २६-०३-२०२१) धुळे महानगर पालिकेतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये आजही विविध मुलभूत सोयी सुविधा पुरविणे बाकी आहे. गल्ली नंबर १ – २ – ३ – ४ – ५ – ६ – ७ पासून ते ८ वी गल्ली आणि जे. बी. रोड भागातील प्रमुख रस्त्यांवर मुख्यत: करून खोल गल्ली – गल्ली क्रं. ४ पासून ते किसन बत्तीवाला चौकापावेतो बंदिस्त बंदिस्त गटारी व्हाव्यात अशी नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे सदरची मागणी मुख्य असून ती तात्काळ पूर्ण करावी ही विनंती. तसेच आवश्यक त्या भागात LED पथदिवे लावणे तसेच गल्ली क्रमांक ४ व ५ ची बोळ मध्ये तसेच ५ व ६ ची बोळ या ठिकाणी आणि आग्रा रोड येथे जे. बी. रोड ते दुर्गा पाईप पावेतो गटारीची दुरावस्था झालेली असून वरील दोन्ही ठिकाणी पाहणी करून तेथील रहिवासी आणि प्रभाग क्रमांक ८ च्या नागरिकांच्या समस्या जाऊन घेऊन गटारींची आणि इतर प्रमुख समस्या पूर्ण कराव्यात.
कचरा संकलन रोज व्हावे आणि प्रभागात वेळेवर पाणी सोडण्यात यावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन प्रभाग क्रं. ८ मधील जनसेवक सौ. लीना निलेश काटे यांनी धुळे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर केले आणि वरील सर्व मागण्या प्रभाग क्रं. ८ मधील जनतेच्या जिव्हाळ्याच्या मागण्या असून सदरच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही विनंती केली. सौ. लीना काटे यांनी यावेळी प्रभाग क्रं. ८ मधील नागरिकांना आवाहन केले कि, आपण मला भरघोस मते दिली आहेत मी आपली ऋणी असून आपल्या प्रभागातील नागरी सुविधांसंबंधी अडचणी सोडविण्यासाठी मी नेहमी कटीबद्ध असून समस्या असल्यास माझ्याशी संपर्क करावा यासाठी त्यांनी मदत क्रमांक म्हणून ९४२२३ ४४४४९ सदरचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
-: आपली स्नेहांकित :-
सौ. लीना निलेश काटे
जनसेवक प्रभाग क्रं. ८
धुळे महानगरपालिका, धुळे






