Dhule

पोटाची खळगी भरण्यासाठी नजीर शेख या मुस्लिम तरुणाने घेतला भगवा झेंडा हाती..जातीयवाद आणि धर्मवादाला फाटा..! शिवरायांचे खरे अनुयायी..!

पोटाची खळगी भरण्यासाठी नजीर शेख या मुस्लिम तरुणाने घेतला भगवा झेंडा हाती..जातीयवाद आणि धर्मवादाला फाटा..! शिवरायांचे खरे अनुयायी..!

धुळे : धुळे सध्या धुळ्यामध्ये नजीर शेख या मुस्लिम तरुणाची चांगलीच चर्चा सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.
नजीर शेख हे धर्माने मुस्लिम असले, तरी पोटाची खळगी भरण्यासाठी ते भगवा झेंडा सायकलवर विकताना दिसत आहेत. नजीर शेख हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिवजयंती असो की, डॉ.बाबासाहेब जयंती, 25 जानेवारी, 15 ऑगस्ट अश्या दिनी ते आपल्या हाती झेंडा घेऊन सायकलवर विकत असल्याचं त्यांनी सांगितले.

त्यांना शिवाजी महाराजांविषयी स्वाभिमान तसेच गर्व असल्याचे देखील नजीर शेख यांनी मोठ्या आनंदाने सांगितल. नजीर शेख यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी भगवा झेंडा हाती घेतल्याचं दिसत असून नजीर शेख यांना भगवा झेंडा विकत असताना त्यांच्याकडे इतर नागरिक मात्र आश्चर्याने बघत त्यांच्याकडून भगवा झेंडा विकत घेत आहेत. मात्र अश्यातच शहरात जाती-धर्माची दरी निर्माण करणाऱ्यांना नजीर शेख यांनी चांगलीच चपराखात लगावल्याच दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button