kalamb

कळंब तालुका भाजपच्या वतीने थकीत बिलावर कारवाईचे आदेश देणा-या सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन

कळंब तालुका भाजपच्या वतीने थकीत बिलावर कारवाईचे आदेश देणा-या सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन

सलमान मुल्ला कळंब

कळंब : आज कळंब भारतीय जनता पार्टीच्या लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलं माफी देण्याचं पोकळ आश्वासन देऊन आता थकीत बिलावर कारवाईचे आदेश देणा-या सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयाला टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करुन या तुघलकी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
कळंब तालुक्यातील सर्व शेतक-यांची विनंती आहे की, मागील वर्षभरापासुन कोरोनामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. आज पुर्ण शेती व्यावसाय कोलमडुन पडलेला आहे. आज मार्केट मध्ये कुठल्याही शेतमालाला नफा कमविण्याइतपत भाव राहिलेला नाही मध्येच अवकाळीच्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतक-यांचे आतोनात नुकसान झालेले आहे.
महाराष्ट्रातील महाभकास आघाडी सरकारने या संकटातील शेतक-यांना अनुदान व विमा स्वरुपातील मिळणारी मदत ही पुरेशी केलेली नाही कुठल्याही मालाला मार्केटमध्ये भाव नाही उलट शेतक-यांच्या नावावर मते मागुन जन्मास आलेल्या दळभद्री महाभकास आघाडी सरकारने तुघलकी निर्णय घेऊन शेतीपंपास अंदाज भरघोस बिले देऊन सक्तीने वसुली चालु केलेली आहे. जे शेतकरी बील भरणार नाहीत त्यांची वीज जोडणी तोडण्याचे पाप हे सरकार करत आहे. त्या विरुध्द भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले व हल्लाबोल आंदोलन करुन सरकारच्या विरोधात घोषना देण्यात आल्या.
यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी,जिल्हा सरचिटणीस श्री.प्रदीप शिंदे,कळंब तालुकाध्यक्ष श्री.अजित दादा पिंगळे, किसान मोर्चा जिल्हा संयोजक श्री.संजय पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे,युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार,तालुका सरचिटणीससंजय जाधवर,माणिक बोंदर,संतोष कसपटे, अरुण चौधरी,नानासाहेब यादव,संदीप बाविकर,मीनाज शेख,सतपाल बनसोडे,शिवाजी गिड्डे,मकरंद पाटील,नारायण टेकाळे,नागनाथ घुले,राजकुमार यादव,अरविंद कदम, रामकिसन कोकाटे, जिव्हेश्वर कुचेकर, गणेश देशमुख,सिद्धेशराजे भोसले,सुधीर बिक्कड इम्रान मुल्ला, आबासाहेब रणदिवे, राजेश टोपे,बालाजी मडके,कमलाकर भोरे, विक्रम भंडारे,रियाज पठाण,गोविंद गायकवाड,तसेच कळंब तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button