आमदार फारुक शाह यांच्या तक्रारीची गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या कडून गांभीर्याने दखल धुळे जिल्ह्यातील विविध विभागातील भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची ACB चौकशी होणार…
असद खाटीक धुळे
धुळे : धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी मुंबई येथे मा.ना.अनिल देशमुख साहेब गृह मंत्री यांची भेट घेत त्यांना तक्रार निवेदन सादर केले की, धुळे जिल्ह्यालगत मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या दोन प्रमुख सीमा आहेत. या ठीकाणांहून गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यातून महाराष्ट्र राज्यात वाहनांना प्रवेश दिला जातो. धुळे जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय असल्याने वाहन तपासणीच्या नावाखाली सर्रास पैशांची मागणी केली जाते. सदरचे काम जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चारुदत्त व्यवहारे यांच्या कारकिर्दीत होत आहे. यातून त्यांनी अमाप संपत्ती जमा केलेली आहे. दुसरे असे की धुळे जिल्ह्यात श्री. रमेश मिसाळ जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शहरातील अनेक शिधापत्रिका धारकांना आजही अन्न धान्याचा लाभ मिळत नाही. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी कुठलीही ठोस कारवाई करत नसुन रेशन दुकानदार आणि त्यांचे आर्थिक साटेलोटे आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हयातील विविध विभागांमार्फत गैरमार्गाने संपत्ती जमा केली आहे. तसेच नगर भूमापन विभागातील नगर भूमापन अधिकारी श्री. पंकज पवार शहरात विस्तारित क्षेत्र तयार झालेले आहेत दुरुस्ती क्षेत्रफळ यासाठी श्री. पंकज पवार यांनी रुजू झाल्यापासून ते आजतागायत केलेल्या काही दस्तांबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. विभागातील सर्वच कागदपत्र देतांना सर्व सामान्य नागरिकांकडून ज्यादा पैशांची मागणी करत मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली आहे.
धुळे जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी भ्रष्ट्राचार करून जमविलेल्या अमाप स्थावर आणि जंगम संपत्तीच्या जोरावर धुळेकर नागरिकांना नाहक त्रास देत वेठीस धरले आहे. या बाबतीत माझ्या मतदार संघातील नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना आहेत. परस्पर आर्थिक हित साधून कामे करत असल्याने शासनाला मिळणाऱ्या महसुलाचे नुकसान होत आहे म्हणून अश्या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची ACB मार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे असे निवेदन आमदार फारुक शाह यांच्या कडून प्राप्त होताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर






