कल्याण मधील फ्लॅटमध्ये सुरु होता सेक्स रॅकेट, 4 बांगलादेशी महिला अटकेत
कल्याण, 20 डिसेंबर : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र थर्टी फस्ट पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. अशातच कल्याणमध्ये एका फ्लॅटमध्ये देहविक्रीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका तरुणासह 4 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील एका घरात छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला आहे.
हाजीमलंग रोडवर एका फ्लॅटमध्ये देहविक्री केली जात असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून फ्लॅटवर धाड टाकली.
गरीब आणि दलित वस्तीवर नजर; मदतीच्या बहाण्याचे मोठं पॅकेज, धर्मपरिवर्तनाचा खेळ!
यात पोलिसांनी मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन याच्यासह चार बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात जितू नामक आरोपी फरार असून त्याच शोध सुरू आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.