धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ७ वे वेतन आयोग लागू आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना यश
महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आमदार फारूक शाह यांचे अनेकांनी मानले फोनवरून आभार…
असद खाटीक धुळे
धुळे : धुळे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी आमदार फारूक शाह यांच्यासह शासनाला ७ वा वेतन लागू होण्यासंदर्भात वेळोवेळी पत्र व्यवहार व निवेदन दिले होते. त्यांच अनुषंगाने धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे पाठपुरावा करत दि. १९-०९-२०२० रोजी सविस्तर निवेदन देत विनंती केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा निवेदनाद्वारे मागणी वजा विनंती केली होती. कोविड-१९ च्या कठीण काळात मनपा कर्मचारी नियमितपणे सेवा बजावीत आहे. सदर कर्मचारी आपल्या जिवावर उदार होऊन काम करीत आहे. तरी अद्यापही सगळ्या कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग धुळे महानगरपालिकेत लागु करण्यात आलेला नाही आहे. तरी सदर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लवकरात लवकर लागु करण्यात यावा. तसेच सदर महानगरपालिकेत १२ ते १४ वर्ष सेवेचा कार्यकाळ पुर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करण्यात आलेली आहे. तरी सदर योजनेचा लाभ धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना देण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन आमदार फारूक शाह यांच्या मार्फत देण्यात आले होते. आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. याबाबत महानगरपालिकेतील विविध कर्मचारी संघटनेने आमदार फारूक शाह यांचे प्रत्यक्ष भेटून व अनेकांनी फोनवरून आभार मानत आनंद व्यक्त केला.
शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर






