भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे सारंखेडा येथील आदिवासी मुलींवर अत्याचार करून केलेल्या हत्येबाबत मारेकऱ्यांना कठोर शासन करावेव जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी…
प्रतिनिधी : असद खाटीक
धुळे : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकामागून एक महिलांवर मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्याबाई यांचा वारसा लाभला आहे.महिला सशक्ति करणाच्या वाटेवर असणाऱ्या व महाराष्ट्रात सध्या महिलांवर अत्याचार वाढलेल्या घटनांनी महाराष्ट्र कलंकित होत आहे. या घटनेमुळे महिला प्रवर्गात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. आपल्या जिल्ह्यातील निमगुळ येथे कुमारी प्राची तिचे अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली फक्त दोन वर्षे वयाच्या या कोमल निष्पाप बालिकेला मारताना दानव होऊनही, निष्कृष्ट वृत्तीचे प्रदर्शन दिसून येते,ही घटना अतिशय हृदय हेलावणारी असून मनाला चटका देणारी व मानव जातीस कलंक करणारी होय. त्या मारेकऱ्यांना त्वरित अटक होऊन त्यांना फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये केस चालवून कठोर शासन व्हावे. जेणेकरून अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाहीत. तसेच शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे पंधरा वर्षे आदिवासी मुलींची निर्घुण हत्या करण्यात आली. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात सामील असणाऱ्या सर्वात त्वरित अटक व्हावी व त्यांनाही कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, महिला मोर्चा अध्यक्ष मायादेवी परदेशी उपमहापौर कल्याणी ताई अंपळकर, महिला बालकल्याण सभापती स्नेहल ताई जाधव नगरसेविका प्रतिभा ताई चौधरी वंदनाताई थोरात, युवती प्रमुख अमृता ताई पाटील, आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा महिला मोर्चा धुळे महानगर






