उत्तर प्रदेशमधील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय दलित पँथर चा धुळ्यात “कँडल मार्च”.
असद खाटीक
उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिच्यावर पिडीत मुलीवर अत्याचार करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचारही केले नाहीत. अखेर त्या पीडितेचे निधन झाले. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून सर्वांची मान शरमेनं खाली घालायला लावणारी आहे. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करत, मनीषा वाल्मिकी या बहिणीला न्याय मिळावा म्हणून आज राष्ट्रीय दलित पँथर च्या वतीने धुळे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर कँडल मार्च काढण्यात आला.
उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी आज सायंकाळी धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानका जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी कँडल मार्च काढण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय दलित पँथर चे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ वाघ, सिद्धार्थ बैसाने, विशाल थोरात, सोनू बोरसे, केतन साळवे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ वाघ (राष्ट्रीय दलित पँथर, जिल्हाध्यक्ष)






