फायनान्स कंपन्यांच्या तगाद्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
प्रतिनिधि/ अझर खाटीक
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे आधीच रोजगार बुडाल्याने रोजची उपजीविका देखील चालवणे कठीण झाले असतांना फायनान्स कंपनी व बँकांकडून बचत गटाच्या महिलांना हप्ते वसुलीसाठी तगादा लावला जात आहे
हातचे काम देखील गेल्यानंतर आता या फायनान्स कंपन्या व बँकांचे हप्ते भरायचे तरी कसे असा प्रश्न या बचत गटाच्या महिलांना पडला असतानाच फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी होत असलेला तगादा यामुळे बचत गटाच्या महिलांनी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपल्या सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्यानंतर आज धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया पासून काही अंतरावर असलेल्या क्यूमाईन क्लब याठिकाणी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य असे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनादरम्यान बचत गटाच्या महिलांना फायनान्स कंपनीच्या तगाद्या पासून मुक्ती मिळावी अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
राज्यसरकारने देखील यासंदर्भात फायनान्स कंपन्यांना सक्तीची वसुली न करण्याचे आदेश द्यावे ही मागणी यावेळी आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली आहे
या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिलांचा सहभाग बघावयास मिळाला बचत गटाच्या महिलांतर्फे आंदोलनादरम्यान राज्य सरकार विरोधामध्ये व फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या धोरणा विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली… अजहर पठाण धुळे,






