राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगड फेक.
असद खाटीक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या राहत्या घरी काल रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घरावर आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीचे मोठे नुकसान केले.
कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्यकारणी धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यानंतर आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
यावेळी रणजीत राजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता घाबरत नाही. अशा हल्ल्यानंतर देखील आम्ही आमचे काम चालू ठेव असा विश्वास यावेळी रणजीत राजेभोसले यांनी बोलताना व्यक्त केला.






