पोलिसांकडून च लाच घेणारा लिपीक एसीबी च्या जाळ्यात.
असद खाटीक
धुळे पोलीस दलाचे मुख्य कार्यालय असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयात सर्रासपणे लाच घेत असल्याचे आरोप वेळोवेळी होतात, मात्र आज चक्क एका पोलीस कर्मचाऱ्या कडून ट्रेझरी मधून बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणार्या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
चंद्रकांत तुकाराम महाले असलेली लीपिकाचे नाव असून त्याने पोलिस दलात कार्यरत एका कर्मचाऱ्याचे ट्रेझरी मधून बिल मंजूर करून देण्यासाठी मध्यस्थी साठी पाच हजारांची मागणी केली होती. सदर कर्मचाऱ्यांना याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून आज दुपारच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून चंद्रकांत महाले या लीपिकाला पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






