खिर्डी खु.येथे लोकसहभागातून वृक्ष रोपण
खिर्डी/भीमराव कोचुरे
खिर्डी खु. ता.रावेर येथील बलवाडी रोड वरील मुस्लिम कब्रस्तान मध्ये लोक सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले त्या मध्ये जांभूळ. सिताफळ.कडूनिंब.चिंच निलगिरी .अशोक वृक्ष तसेच विविध वृक्ष लागवड करुन सर्वांनी त्याचे संगोपन करण्याचं आवाहन करण्यात आले. त्या सोबतच आपण आपल्या परिसरात वृक्ष लागवड केल्यास त्यांचं संरक्षण व संगोपन योग्य रित्या होईल. हा उपक्रम खिर्डी खु. या गावा मध्ये नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात लोकसहभागातून राबवण्यात यावा असे मत वृक्ष रोपणा च्या कार्यक्रम प्रसंगी ग्रा. वि. अधिकारी गोकुळ सोनवणे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी उपस्थित ग्रा.प सदस्य अल्ताफ बेग रहीम बेग नागरिक राजू कोचुरे, पंकज बाविस्कर ,सादिक पिंजारी अशोक कोचुरे,मनोज कोचुरे , ग्रा. रो.सेवक प्रदीप कोचुरे आदी उपस्थित होते.






