Usmanabad

२०१७ ते २०२० दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता झगडे यांच्यामार्फत उस्मानाबाद कळंब भूम वाशी परंडा आदी ठिकाणी केलेल्या बोगस कामाची चौकशी करा

२०१७ ते २०२० दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता झगडे यांच्यामार्फत उस्मानाबाद कळंब भूम वाशी परंडा आदी ठिकाणी केलेल्या बोगस कामाची चौकशी करा
बहुजन विकास मोर्चा उस्मानाबाद ची मागणी

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत पारदर्शक कामे करण्याचा दावा सरकार करत आहे मात्र काही सरकारी अधिकारी त्याला ‘हरताळ’ फासताना दिसत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सन २०१७ ते २०२० या कार्यकाळात उस्मानाबाद कळंब भूम वाशी परंडा अंतर्गत रस्ते नाला बंधारे इमारतींच्या कामाची दुरावस्थास बऱ्याच ठिकाणी झालेली दिसून येत आहे तसेच बरेच ठिकाणी रस्ते न बनवता पैसा लाटण्याचे काम अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळे गुत्तेदार यांनी केल्याचे दिसून येत आहे..

राज्य महामार्ग यांच्या झालेल्या अवकळा अधिकारी झगडे यांच्या कार्यकाळात किती रस्ते इमारती बंधखरे आधी विकासकामे पूर्ण झाले तसेच या कामासाठी किती निधी खर्च झाला तसेच किती कामे पूर्ण झालेत व कीती कामे अपूर्ण राहिली..

त्याची सखोल चौकशी करून कोणत्या कामाकरिता किती बिले देण्यात आली.तसेचया चालू तीन वर्षात झगडे यांनी गुत्तेदारांना संगनमत करून आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी पद्धतीने टेंडर काढून त्यांच्या सोयीने गुत्तेदार यांचे लागेबांधे करून निधी ठेकेदारांच्या घशात घालण्याचा डाव त्यांनी केला असून अनेक कामे ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून टेंडर मधील अटी शर्ती असण्याचा दावा त्यांनी केला असून यासाठी बेहीशेबी मालमत्ता जमा केली आहे.

आणी त्यांच्या संपत्तीची व सर्व कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमून तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार उघडकीस आणवा ही नम्र विनंती अन्यथा दिनांक १३/०९/२०२० रोजी पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येतील याची नोंद घ्यावी

असेही या निवेदनात म्हटले आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button