Usmanabad

विरशीव गणेश मंडळातर्फे कोरोना योध्दांचा सत्कार व रक्तदान शिबीराचे आयोजन. १५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

विरशीव गणेश मंडळातर्फे कोरोना योध्दांचा सत्कार व रक्तदान शिबीराचे आयोजन.१५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सलमान पठाण

या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्तीस्थापनेवर निर्बंध करण्यात आलेले आसल्याने येथील ढोरगल्लीच्या लोकांनी सार्वजनिक गणपतीची प्रतीवर्षाप्रमाणे साजरा न करता व परंपरा न मोडता घरगुती श्रीगणेश मुर्तीची गल्लीतच स्थापना केली व शेवटच्या दिवशी जागेवर विसर्जन करण्यात आले. तिथेच रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

विरशीव ककैया गणेश मंडळाकडुन गेल्या पाच महीन्यांपासुन कोरोनाच्या कालावधीत अविरतपणे आपले कर्तव्य तर बजावले व आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कुटुंब बाजुला ठेऊन सामाजिक अविरतपणे सेवा देणारे अरोग्य विभागातील डॉ. व आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती व पोलीस प्रशासन व पंचायत प्रशासन व पत्रकार मित्र यांचे कोरोना योध्दा म्हणुन त्यांचे सत्कार करुन गौरव करण्यात आला.

त्यामध्ये आरोग्य विभागाचे डॉ. वैभव कांबळे व डॉ. गौसोद्दीन शेख व औरादमध्ये कर्तव्यावर असलेल्या सर्व आशा कार्यकर्त्या यांचे तर पंचायत विभागाचे ग्रामसेवक धनाजी धनासुरे यांचे व पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी व पोलीस कॉन्स्टेबल धनराज हरणे व भाऊसाहेब मंतलवाड यांचा तर पत्रकार मित्र म्हणून दीपक थेटे (पुण्यनगरी), बालाजी थेटे (लोकमत), अमोल ढोरसिंगे (सामना), सलमान पठाण यांचे या सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने त्यांना कोरोना योध्दा म्हणुन गौरव करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

यामध्ये गणेश मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश त्रिमुखे व सचिव दिनेश इंगळे दयानंद त्रिमुखे , संतोष त्रिमुखे , धनराज त्रिमुखे , रमेश पात्रे , चंद्रकांत मदाळे सर , माजी सरपंच तथा माजी सैनिक दिलीप कांबळे , महेंद्र कांबळे , राहुल कांबळे , दत्ता कांबळे , भोई मोतीराम , शत्रु भोई , लक्ष्मण त्रिमुखे व पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button