Usmanabad

आता पासची गरजच नाही, केंद्रीय गृहसचिवांचे निर्देश

आता पासची गरजच नाही, केंद्रीय गृहसचिवांचे निर्देश

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

लाॅकडाऊनमधील निर्बंधांमध्ये राज्यात आणि आंतरराज्य प्रवासावर बंधन घालण्यात आली होती. त्यासाठी ई-पासची अट घालण्यात आली होती.

ती अट आता शिथील करण्यात आली असून, आता कुणालाही पासविना प्रवास करता येणार आहे. ई- पासची आवश्यकता नाही, याचा उल्लेख अनलाॅक ३ जाहीर करताना दिलेल्या नियमावलीत करण्यात आला आहे.

आता केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढं सांगून देखील कुणी प्रवासावर बंधनं आणली तर गृहखात्याने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली समजली जाईल, असेही भल्ला यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता राज्यात आणि आंतरराज्य प्रवासी तसेच सामानाची वाहतूक सुरळीत होण्याची आशा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button