कळंब नगराध्यक्षाच्या पतीसह उपनगराध्यक्ष यांना कोरोना
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यातील वाढते करण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसापासून कमी झाले होते परंतु आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ती धक्कादायक बाब म्हणजे कळंबचा नगराध्यक्ष व त्यांचे पती यांच्यासह कळंबचे उपनगराध्यक्ष हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत मात्र नगराध्यक्षा यांना कोरोनाची लागण कुठून झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
तरी गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन आपली तपासणी करून घेण्याचे आव्हान त्यांनी आपल्या फेसबुक पेज या माध्यमातून केले आहे..






