घरोघरी दिव्यांचा लखलखाट, रांगोळी,अण्णाभाऊ साठे जयंती डिकसळ येथे साजरी…!!!
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
मौजे डिकसळ ता.कळंब येथे शासकीय सर्वं नियम पाळुन दिवसभर विवीध ठिकाणी अण्णाभाऊंच्या प्रतिमांचे पूजन व झेंडा वंदन करण्यात आले,तसेच संध्याकाळी साठे नगर, लहुजी चौक परीसरात घरोघर रांगोळी व दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने अण्णाभाऊंच्या जन्मांचे आनंदी वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आली.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांनी समाज बांधवांना उद्देशून सांगितले की, भावनेच्या भरात जाऊ नका आपल्या कुटुंबाला कोरोणा या संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा,शासनाने दिलेले सर्वं नियम पाळा असे त्यांनी सांगितले..
तसेच या कार्यक्रमाला उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संभाजीभाऊ कांबळे, जिल्हा सचिव संतोषभाऊ मोरे,जिल्हा समन्वयक अजयभाऊ कांबळे, करंजकल्ला सर्कल प्रमुख शरदभाऊ झोंबाडे,चौसाळा सर्कल प्रमुख अनिलभाऊ सिरसट,भारत सिरसट,सह अन्य समाज बांधव उपस्थित होते.
सर्वं कार्यक्रमाचे शासकीय नियमानुसार सुंदर आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समिती व लहुजी शक्ती सेना शाखा डिकसळ चे सर्वं पदाधिकारी समाज बांधव,वडील धारी मंडळी,बंधु भगिनी यांनी केले होते,सदर उपक्रम लहुजी शक्ती सेनेचे उस्मानाबाद जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष व डिकसळ ग्रामपंचायत सदस्य बालाजीभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.






