Dhule

बोरीस येथे आरो वॉटर व एटीएम वॉटर जलसेवा लोकार्पण संपन्न

बोरीस येथे आरो वॉटर व एटीएम वॉटर जलसेवा लोकार्पण संपन्न

प्रतिनिधी धुळे , राहुल साळुंके

धुळे जिल्हा स्तरीय ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त असलेल्या बोरीस ग्रामपंचायतीमार्फत आर अो व एटीएम वॉटर सेवा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

ग्रामपंचायत बोरीस मार्फत सदरील जलसेवा उद्घाटन खासदार सुभाषजी भामरे यांच्या शुभहस्ते झाला,यावेळी

भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष देवरे यांच्या मार्गदर्शनाने बोरीस ग्रामपंचायतीतर्फे बोरीस ग्रामस्थांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले.

ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या विविध विकास कामांना प्राधान्य देण्यास बोरिस गाव नेहमी अग्रेसर असते, व या सेवेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन खासदार सुभाषजी भामरे यांनी केले.

दरम्यान_ विविध विकासकामांना प्राधान्याने अग्रक्रम देऊन गावकऱ्यांसाठी योजना राबवण्यात बोरीस ग्रामपंचायत अग्रेसर असल्यानेच मागील महिन्यात धुळे जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार बोरीस ग्रामपंचायतीने पटकाविला होता.

यावेळी समवेत सुभाषदादा देवरे सभापती धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती,
माजी सरपंच विलास देवरे,युवा उद्योजक निखील देवरे, धरती देवरे सभापती महिला व बालकल्याण, प्रा.विजय पाटील सभापती पंचायत समिती धुळे,
देवेंद्र पाटील तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी धुळे वत्सलाबाई कुवर सरपंच बोरीस दिलीप बेहेरे उपसरपंच विश्वास पाटील,राधाबाई देवरे,कल्पनाबाई भिल,सरूबाई भिल,संगीता माळी,गोरख भिल ग्रामविकास अधिकारी भास्कर सोनवणे यांसह मान्यवर ग्रामस्थ सोशल डिस्टसिंग पाळून उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button