उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
प्रतिनिधी-सलमान मुल्ला
कोरोना च्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारीआणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र त्यांनादेखील आता कोरोनाची लागण होत आहे.तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आहे.
कोरोनामुळे मयत झालेले पोलीस कर्मचारी (वय54 वर्ष) हे परंडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांना झालेले पोलिस कर्मचाऱ्यास लिव्हर आणि किडनी चा त्रास होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यु झाला.
त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना मुळे मयत रुग्णांची संख्या 8 झाली आहे.
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली आहे.






